Alandi: कार्तिकी यात्रे निमित्त इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – कार्तिकी यात्रे निमित्त लाखो वारकरी भाविकांचे(Alandi) आळंदी मध्ये आगमन होते.त्यानिमित्ताने कल्याण शहर स्वच्छ भारत अभियान टीम व कल्याण शहर वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आळंदीतील इंद्रायणी नदी मातेच्या दोन्ही घाटाची स्वच्छता (दि.29 रोजी) करण्यात आली.

कल्याण शहर स्वच्छ भारत अभियान टीम व कल्याण शहर वारकरी संप्रदाय यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समधीचे दर्शन घेतले.त्यानंतर इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान राबवले आणि त्यांनी स्वच्छते बद्दल जन जागृती केली.

PCMC : महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची मंत्रालयात बदली

या अगोदर ही कल्याण पूर्वचे (Alandi)आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या सहकार्याने त्यांनी स्वच्छता अभियान आळंदी मध्ये राबविल्याचे यावेळी सांगितले. तसेच त्यांनी सांगितले आळंदी,देहू आणि भंडारा डोंगर यांचा दर्शनाचा लाभ होऊन तिथे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला.

कल्याण पश्चिम नरेंद्र (नाना )सूर्यवंशी यांच्या तर्फे कल्याण ते आळंदी बस ची व्यवस्था करण्यात आली होती.विष्णू सांगळे,रवी गुप्ता व बिपीन मिश्रा यांनी ही यावेळी इतर खर्चाचा भार उचला.आळंदी नगरपालिके तर्फे अग्निशमन दलाचे स्वच्छता कार्यात सहकार्य लाभले.चंद्रभान महाराज सांगळे यांच्या माध्यमातून
पालिकेस याबाबत कळवण्यात आले होते.

जगन्नाथ नेहरकर(मामा) व मृत्यूंजय शुक्ला यांनी सर्वांना एक साथ घेऊन सुरक्षित नेण्याचे व आणण्याचे कार्य संपन्न
केले.याबाबत माहिती मृत्यूंजय शुक्ला यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.