Pimple Nilakh : वेश्याव्यवसाय प्रकरणी महिलेला अटक, दोन पिडींताची सुटका

एमपीसी न्यूज – वेश्याव्यवसाय प्रकरणी पोलिसांनी पिंपळे निलख (Pimple Nilakh)येथून एका महिलेला अटक केली आहे तर दोन पीडितांची सुटका केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 30 नोव्हेंबर रोजी पिंपळे निलख येथील डीपी रोड येथे केली आहे.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पोलीस(Pimple Nilakh ) नाईक गणेश करोटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिलेला अटक कऱण्यात आली आहे.

Alandi: कार्तिकी यात्रे निमित्त इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.