Bhosari : मॉन्जीनिजची फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने महिलेची 9 लाख रुपयांची फसणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मॉन्जीनिजची फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने महिलेची 9 लाख 69 हजार रुपयांची फसणूक करण्यात (Bhosari) आली आहे. हा सारा प्रकार जानेवारी ते मार्च 2023 भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून 9593729262 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यातच करणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हॉटस अपवर आरोपीने मॅसेज केला. यावेली त्याने मॉन्जीनीज फुडस मधून (Bhosari ) बोलतोय असे सांगितले. त्याने मॉन्जीनिजचा लोगो असलेले अप्रुव्हल लेटर फिर्यादीला पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे मिळून 9 लाख 69 हजार 370 रुपये घेतले व आजतायगायत फ्रेंचायझी न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.