Chinchwad : चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज : महासाधू श्री मोरया गोसावी (Chinchwad) यांच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवडनगरीमध्ये माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाचे आयोजन  केले आहे.

50x 21 आकार व 35 फुट उंच अशा भव्य आकाराचे मंदिर प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून 350व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त महाराजांना अभिवादन  करून गजानन चिंचवडे यांनी या महोत्सवाची सुरुवात केली.

Bhosari : मॉन्जीनिजची फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने महिलेची 9 लाख रुपयांची फसणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आज सलग 10 वर्षापासून ही महोत्सव परंपरा सुरू आहे. चिंचवड नवरात्र महोत्सवात ललिता पंचमी निमित्त कुमारिका पूजन आयोजित करण्यात आले होते. युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या 56 मुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता.

येथे कन्यापूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. अजित जगताप यांनी कुमारिका पूजन व हिंदू संस्कृती याचे महत्त्व विशद केले. मुलींना खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या. कुंकूमार्जनासाठी सोहम योग साधना वर्गाच्या सर्व महिला साधक व भीमरूपी उपासना मंडळाचे सर्व महिला सदस्य उपस्थित होते.

तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन सोहळा आज पासून दसऱ्यापर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तरी (Chinchwad) भाविकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास सोहम योग साधनाचे उचगावकर, नेर्लेकर, दिगंबर चिंचवडे, माणिक म्हेत्रे, दिनेश जांभळे, सूर्यकांत भोसले,  अंगद गुरव, संदीप माने, स्वाती चौधरी, हेमा कस्तुरे, वर्षा जाधव, शिल्पा डोंगरे, भाग्यश्री देशमुख, शोभा कारंडे, कविता बारसावडे, पुष्पा पाटील, दीपाली नेवसे आदींचे सहकार्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.