Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यातच करणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (Pune ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समस्त शोषित, वंचित, दलित समाजबांधवांची अस्मिता आणि श्रद्धा असल्याने 14 एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यातच करणार, असा ठाम निर्धार पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) येथे नुकत्याच झालेल्या या बैठकीचे आयोजन सचिन गुलाब गजरमल, राकेश सोनवणे, नागेश भोसले आदींनी केले होते. विविध जयंती साजरी करणारे मंडळे व संघटना, कलाकार, साऊंड अॅन्ड स्पीकर असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आग्रही भावनेतून आपआपले मत व्यक्त केले. याबाबत 21 ऑक्टोबर रोजी पत्रकाद्वारे बैठकीतील सूर जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजक नागेश भोसले, सचिन गजरमल, राकेश सोनवणे,ज्येष्ठ नेते वसंत (दादा) साळवे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, निलेश आल्हाट, राहुल डंबाळे, नागेश भोसले, मिलिंद गायकवाड, अॅड. मिलिंद अहिरे, कोब्राराजे अॅड भाई विवेक चव्हाण, राजाभाऊ भोसले, दत्ता पोळ, अॅड. किरण आल्हाट, बापुभाऊ खरात, पप्पू उर्फ सचिन खरात, उमेश चव्हाण, राकेश सोनवणे, सचिन गजरमल, संजय आल्हाट, तानाजी ताकपेरे, पूजाताई वाघमारे, ज्योतीताई गायकवाड, विद्याताई शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहर, पुणे जिल्हयामध्ये जल्लोषाने जयंती साजरी करणारी मंडळे देखील (Pune ) या बैठकीत सहभागी झाली.अखिल विश्रांतवाडी मित्र मंडळ, संविधान ग्रुप, पुणे स्टेशन, भिमसेवा प्रतिष्ठान, दलित पँथर, दलित पँथर ऑफ इंडिया, अजिंक्य भीम ज्योत सेवा संघ, भीम कांती मित्र मंडळ, मिलिंद संघ कोथरूड, अखिल अप्पर सुपर मित्र मंडळ, भिम कांती मित्र मंडळ, सिध्दार्थ संघ आँध रोड, स्व. संजयभाऊ खुडे सेवा प्रतिष्ठान, लष्करे भिमा, भारतीय दलित कोब्रा, फुले -शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान, भीम नगर तरूण मंडळ, करूणा महिला मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भीमजयंती साजरी करणाऱ्या आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, कलाकार, साऊंड अॅन्ड स्पीकर असोसिएशनचे पदाधिकारी या संवाद बैठकीस आणि खुल्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते.

‘पुणे शहरातील स्वतःला बुध्दीजीवी समजणाऱ्या स्वयंघोषित मोजक्या लोकांनी डी. जे. मुक्त जयंती करण्याचे केलेले आवाहन हे षडयंत्र असून त्याचा समाचार या बैठकीत घेण्यात आला ‘,अशी माहिती सचिन गजरमल यांनी बैठकीनंतर आज पत्रकाद्वारे दिली.

‘वर्षभर वाचू ,एकदा जल्लोषात नाचू !’- कार्यकर्त्यांची भावना

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे त्यांचे अनुयायी म्हणून, त्यांनी घालून दिलेल्या ‘शिका’ या मूलमंत्रानुसार शिक्षणाचे महत्त्व जाणून वर्षाचे 365 दिवस वाचतो. ज्या महामानवाने आम्हांला वाचून माणूस बनविले त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आनंदाने नाचतो !

यंदाच्या वर्षी डी. जे. मुक्त जयंती करण्याचे आवाहन करून काहींनी जे षडयंत्र रचले आहे ते हाणून पाडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र असणे गरजेचे आहे’, असे गजरमल यांनी सांगितले.

‘वर्षभरात विविध जातीधर्माचे सण-उत्सव साजरे केले जातात. त्या-त्या जाती-धर्मातील महामानवांची, थोरामोठ्यंची जयंती उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात केल्या जातात. अशा कार्यक्रमांमध्ये सध्या प्लाझमा साऊंड सिस्टीमचा आणि लेझर लायटिंगचा ट्रेन्ड आला आहे .

Lalit Patil Drugs Case : येरवडा कारागृहातच आखली ललित पाटीलने मेफेड्रोनच्या कारखान्याची योजना; पुणे पोलिसांचा खुलासा

काळजाला धडकी भरवणाऱ्या (Pune ) प्लाझमा साऊंड सिस्टीममुळे काही जण हृदयविकाराच्या धक्क्याने दगावले, तर लेझर लायटिंगमुळे काहींना दृष्टिदोष निर्माण झाले. ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. मात्र जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सावधगिरी बाळगणे ही सर्वस्वी ज्याची त्याची जबाबदारी आहे’, असे बैठकीतील वक्त्यांनी सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, महंमद पैगंबर या महापुरुषांची जयंती असो किंवा गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी दसरा अशा सण-उत्सवाप्रसंगी सध्या प्लाझमा साऊंड सिस्टीम आणि लेझर लायटिंगची आतिषबाजी करण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे तरूणाईच्या उत्साहाला बहर येतो. हे सुध्दा खरेच आहे.

वर्षभरात एकदाच साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांवर आणि संयोजकांवर कितीही कडक निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला तरी ते निबंध केवळ कागदोपत्रीच असल्याचे निदर्शनास येते. अपवादात्मक स्थितीत काही मंडळांवर गुन्हे दाखल होतात सुध्दा. पण आपली श्रध्दा आणि अस्मिता असणाऱ्या महापुरूषांच्या प्रेमापोटी, आदरापोटी त्याची तीव्रता किंवा धग कार्यकत्यांना जाणवत नाही.

म्हणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचे वळ देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजीची जयंती जल्लोषात आणि धूमधडाक्यातच करणार. हा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हट्ट योग्यच असल्याचे म्हणावे लागेल’, असा सूर यावेळी झालेल्या संवाद बैठकीत उमटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.