Lalit Patil Drugs Case : येरवडा कारागृहातच आखली ललित पाटीलने मेफेड्रोनच्या कारखान्याची योजना; पुणे पोलिसांचा खुलासा

एमपीसी न्यूज : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांना महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. ललितने आपल्या (Lalit Patil Drugs Case) मित्रांसह  येरवडा कारागृहात असताना मेफेड्रोनच्या कारखान्याची योजना आखल्याचे पुणे शहर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

ड्रग्ज रॅकेटर ललित अनिल पाटीलने ही योजना सहआरोपी अरविंदकुमार प्रकाशचंद लोहारे (वय 42 वर्ष) याच्यासोबत कारागृहातच आखली होती.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर 2020 मध्ये चाकण येथून 20 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या 22 जणांमध्ये लोहरे, केमिकल इंजिनीअर आणि ललित यांचा समावेश होता.

Pimpri : राडारोडा रस्त्यावर टाकणा-या बिल्डरवरील कारवाईस पालिका प्रशासनाची टाळाटाळ

ललितला कारागृहात लोहारेकडून मेफेड्रोनची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. त्याने पुढे त्याचा भाऊ भूषण पाटील याला मेफेड्रोनचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले, असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांच्या चौकशीनुसार, भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांनी डिसेंबर 2022 च्या सुमारास (Lalit Patil Drugs Case) ललितच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या शिंदेगाव एमआयडीसीमध्ये कारखाना सुरू केला.

पोलिसांनी भूषण आणि बलकवडे यांना शुक्रवारी दुपारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील नीलम यादव इथापे यांनी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.

30 सप्टेंबर रोजी पुणे शहर पोलिसांनी ललितचा साथीदार सुभाष मंडल याला ससून रुग्णालयाजवळ 2.14 कोटी रुपयांच्या 1.71 किलोग्राम मेफेड्रोनसह अटक केली. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल असलेल्या ललितने रुग्णालयातील कँटीन कर्मचारी रऊफ शेख याच्यामार्फत  मंडलला ड्रग्ज पुरवठा केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.