Alandi : पादाचारी व्यक्तीस वाहनाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आळंदी देहू रस्त्यावर जय गणेश लॉन्स समोर, मोशी येथे रस्ता (Alandi) ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.

अरुण शंकर पाटील (वय 38) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे.(Alandi) याप्रकरणी माणिक दिलीप पाटील (वय 36, रा. चाकण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत भाऊ अरुण पाटील हे आळंदी देहू रस्त्यावर मोशी येथे गणेश लॉन्स समोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहन चालकाने पाटील यांना धडक दिली. यामध्ये पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.