Bhosari : गॅस एजन्सीमध्ये 15 सिलेंडर चोरणारा चोरटा अटकेत

फिर्यादी इटकर यांची खडकी येथे गॅस एजन्सी असून, त्यांचा कामगार दापोडी येथे राहण्यास आहे. : Thief arrested for stealing 15 cylinders at a gas agency

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीच्या टेम्पोतून 15 सिलिंडर आणि बॅटरीची चोरी झाली. दापोडी येथे रविवारी (दि. 16) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चोरटा गॅस एजन्सीमध्ये पूर्वी कामाला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याला अटक केली.

राजाराम तेजाराम खावो (वय 38, रा. जयमालानगर, पवनानगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवकिरण लक्ष्मण इटकर (वय 27, रा. रामनगर, वाघोली) यांनी रविवारी (दि. 16) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इटकर यांची खडकी येथे गॅस एजन्सी असून, त्यांचा कामगार दापोडी येथे राहण्यास आहे.

शनिवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कामगाराने गॅस सिलिंडर असलेला टेम्पो नेहमीप्रमाणे दापोडीच्या सीएमई गेट समोरील एका एटीएम सेंटरसमोर पार्क केला.

रविवारी (दि. 16) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टेम्पोतील 15 गॅस सिलिंडर आणि टाटा कंपनीची बॅटरी असा एकूण 81 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

भोसरी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित आरोपी दिसून आला. फिर्यादी इटकर यांनी आरोपी राजाराम खावो याला ओळखले. तो आपल्याकडे यापूर्वी कामाला होता असे पोलिसांना सांगितले.

आरोपी राजाराम खावो हा गॅस सिलिंडरची विक्री करण्यासाठी दापोडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर रासकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्यास अटक केली.

सुरवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्‍या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.