NIA : एनआयएने अटक केलेल्या डॉक्टरचा मोठा खुलासा; दहशतवाद्यांना दिले घर आणि नोकरी

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये एनआयएची दहशतवाद्यांविरोधात (NIA) धडक मोहीम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोंढवा हा दहशतवाद्यांचा हॉटस्पॉट होतोय का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याच दरम्यान काल पुन्हा एकदा एनआयएने इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणा अंतर्गत कारवाई करत पुण्यातील भुलतज्ञ डॉक्टर अदनानली सरकार याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 

काही दिवसांपूर्वी कोंढव्यातून एनआयएने अब्दुल कादीर आणि दस्तगीर पठाण अशा दोन दहशतवाद्यांना अटक केले होते.  अदनानलीने पकडलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना घर मिळवून दिले होते. एवढेच नव्हे तर आठ हजार रुपये मासिक पगारावर त्या दोघांना ग्राफिक डिझाईनचे कामही दिले होते.

अदनानलीला या दहशतवाद्यांची पार्श्‍वभूमी माहिती असतानाही त्याने त्यांना आश्रय दिला होता.

Aabha Card : तुमच्या वैद्यकीय इतिहासासाठी ‘आभा आरोग्य कार्ड’ आजच नोंदणी करा

याच प्रकरणात कोथरूड पोलिसांच्या पथकाने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान, महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी यांना दुचाकी चोरीच्या संशयातून अटक केली होती त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांचे दहशतवादी कनेक्शन पुढे आले आहे.

हे दोघे ही जयपूर बॉबस्फोटमधील फरार आरोपी आहेत. यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च 2022 मध्ये मुंबईतील भेंडी बाजार येथे पळून आले होते.

पुण्यात आल्यानंतर ते कोंढवा भागात एका मशिदीमध्ये राहू लागले. तेव्हा त्यांची ओळख अब्दुलशी झाली.  आम्ही गरीब असून कामाच्या शोधात पुण्यात आल्याचे त्यांनी अब्दुलला त्यावेळी सांगितले होते.

आता या प्रकरणात एनआयए कोणती मोठी भूमिका घेणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. पुण्यातील कोंढवा येथून पकडलेल्या या दहशतवाद्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.