Pune : रास्ता पेठेत कोसळले जुने वडाचे झाड; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यात गेले काही दिवस सलग (Pune) पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ता खचणे, झाडपाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काल रात्री (27 जुलै) रास्ता पेठेतील पॉवर हाऊससमोरील जुने वडाचे झाड कोसळले. यामध्ये  दोघेजण जखमी झाले आहेत. यात तीन दुचाकी, टेम्पो आणि हातगाडीचे नुकसानही झाले. 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक रेस्क्यू व्हॅन आणि दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना केईएम रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. झाड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

NIA : एनआयएने अटक केलेल्या डॉक्टरचा मोठा खुलासा; दहशतवाद्यांना दिले घर आणि नोकरी

महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान आणि उद्यान विभागाच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून झाड दूर करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.