Bollywood News : कॅटरीनाच्या बहीणीची आता बॉलीवूडमध्ये एंट्री

एमपीसी न्यूज : कॅटरीना कैफची बहिण इसाबेल कैफ आता बॉलीवूडमध्ये एंट्री घेण्यास सज्ज झाली आहे. इसाबेलचा पहिला चित्रपट हा अभिनेता पुलकित सम्राट याच्याबरोबर असणार आहे. पुलकित सम्राट आणि इसाबेल यांनी त्यांच्या शूटींगची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

या चित्रपटाचे नाव ‘सुस्वागतम खुशामदीद’ असे आहे. “नमस्ते-आदाब, अब जल्द होगी आपसे मुलाकात. सिनेमाची पहिली झलक तुमच्यासमोर सादर करत आहे”, असे म्हणत पुलकितने इसाबेलबरोबरचे छायाचित्र शेअर केले आहे. चित्रपटाचा पहिला लूक बघून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.

धीरज कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून एंडेमोलशाईन व यलो आंट प्रॉड्क्शन ह्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखक मनीश किशोर आहेत. पुलकित आणि इसाबेलने नृत्यगुरू गणेश आचार्य यांच्याबरोबरदेखील नृत्याचे शूट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.