Bollywood News : करण जोहरने निवृत्त व्हावे – कंगना रणौत

एमपीसी न्यूज : कंगना रणौतने शनिवारी सकाळी तिच्या इंस्टाग्राम (Bollywood News) स्टोरीजवर करण जोहरला त्याचा नवा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’साठी फटकारले. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे प्रमुख भूमिकेत आहेत. एका लांब नोटमध्ये, कंगनाने करणच्या चित्रपटाची तुलना डेली सोपशी केली आणि त्याच्यावर भारतीय सिनेसृष्टीला मागे खेचण्याचा आरोप केला.

कंगनाने लिहिले, भारतीय प्रेक्षक अणुबॉम्बची उत्पत्ती आणि अणुविज्ञानचे चित्रपट बघायला उत्सुक आहेत, तर इथे नेपो गँगचे तेच सासू सुनेचे रडगाणे सुरु आहे. एक डेली सोप बनवण्यासाठी 250 कोटींची गरज का आहे? सारखे सारखे तेच चित्रपट बनवायला लाज वाटायला हवी.”

Alandi : कमला एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

पुढे तिने लिहिले, “स्वतःला भारतीय सिनेसृष्टीचा चेहरा म्हणायचे तर दुसरीकडे बॉलिवूडला मागे खेचायचे. उद्योगासाठी ही सोपी वेळ नाही, निधी वाया घालवू नका, आता निवृत्त व्हा आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना नवीन आणि क्रांतिकारी चित्रपट बनवू द्या.”

कंगना ही आधीपासूनच बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या घराणेशाहीवर भरपूर बोलली असून, तिने नेपो (Bollywood News) सेलिब्रिटींविरुद्ध सुद्धा स्वतःचे मोहीम लढवली आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करणच्या’ पाचव्या सिजनमध्ये जेव्हा कंगणा पाहुणी म्हणून आली होती, तेव्हा सुद्धा तिने करणचे वर्णन हे नव्या होतखरू व बॉलिवूडमध्ये गॉड फादर नसलेल्या कलाकारांसाठी ‘खलनायक’ असे केले होते.

करणने सुद्धा स्वतःकडून कंगनाला बऱ्याच वेळा अप्रत्यक्ष टोमणे मारले आहेत व त्यांच्यातील शब्दांचे हे युद्ध गेली बरेच वर्षे छोट्या-मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.