Alandi : आळंदी येथील एम.आय.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2023 मध्ये घेतलेल्या (Alandi) शिक्षणशास्त्र पदवी (बी. एड.) परीक्षेचा आळंदी (ता. खेड) येथील एम.आय.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुवर्णा म्हस्के हिने प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2023 मध्ये घेतलेल्या शिक्षणशास्त्र (बी. एड.) द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून महाविद्यालयातील 100 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे –

सुवर्णा म्हस्के (प्रथम क्रमांक 82.90 टक्के), शितल शेंडे (द्वितीय क्रमांक 82.75 टक्के), राजेश्वर पाखरे (तृतीय क्रमांक 82.50 टक्के), प्रणाली सोनवणे (चतुर्थ क्रमांक 81.90 टक्के), प्रियांका भावे (पाचवा क्रमांक 81.25 टक्के)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. प्रतिभा दाभाडे, प्रा. अंगद जावळे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर, डॉ. शिल्पा गावंडे, प्रा. संजय शिंदे, प्रा. दर्शना पवार, प्रा. शेखर क्षीरसागर, प्रा. दिशा ठाकूर, प्रा. संदीप गाडीलकर यांनी मार्गदर्शन केले.

AAP : आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी चेतन बेंद्रे यांची नियुक्ती

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले (Alandi) आहे. महाविद्यालयाच्या वतीने बी.एड्. अभ्यासक्रम हा अत्यंत आधुनिक पद्धतीने शिकविण्यात येतो. यामध्ये तंत्रज्ञानावर आधारीत पाठ, 4.0 मधील नाविन्यपूर्ण उपक्रम, परदेशी शिक्षणाची संधी, आंतरराष्ट्रीय परिषदा, भारतीय संस्कृती व मूल्य शिक्षण याबरोबरच नोकरीची हमी देण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी सांगितले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.