Bollywood : अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान नंतर आता रणवीर सिंग साकारणार ‘डॉन’ची भूमिका

एमपीसी न्यूज – सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान (Bollywood) नंतर आता रणवीर सिंग स्वतःच्या पुढच्या चित्रपटांमध्ये ‘डॉन’ ची भूमिका साकारणार आहे. फरान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

चित्रपटाची घोषणा करत रणवीर सिंगने स्वतःच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा एक बारका टीचर शेअर केला. त्यामध्ये तो आधीच्या डॉन मधल्या ‘ग्यारह मुल्को की पुलिस’चा संवाद म्हणताना दिसत आहे.

डॉन चित्रपटांना घेऊन भारतामध्ये दोन पिढ्या जोडल्या गेल्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा डॉन जरी मूळ असला तरी शाहरुख खानने (Bollywood) चांगला अभिनय केला होता.

Pimpri : राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत एचए शाळेच्या चार खेळाडूंना सुवर्ण

परंतु रणवीर सिंगला डॉनच्या भूमिकेत बघून नेटकरी थोडे नाराजच दिसत आहेत. बऱ्याच जणांचे म्हणणे आहे की डॉन फक्त बच्चनच साकारू शकतात परंतु त्यांचे वय झाले म्हटल्यावर शाहरुख खाननेच डॉन साकारावा.

शाहरुख खानचा आत्ताच पठाण चित्रपट आल्याने प्रेक्षकांना तो अजून हवाहवासा झाला आहे. परंतु त्यामध्ये 2 डॉन चित्रपटांमध्ये शाहरुख खानने काम केले असूनही तिसऱ्या भागांमध्ये त्याला संधी दिलेली नाही याची खंत प्रत्येक भारतीय सिनेफाईलला होत आहे.

काही नेटकरी तर हेही म्हणत आहे की इस ‘डॉन का इंतजार एक भी मुल्क की पोलीस नही कर रही’. परंतु रणवीर सिंगच्या बाजूनेही त्याचे बरेच चाहते उभे आहेत.

फरान अख्तर आणि दीपिका पादुकोणने ही रणवीरला प्रोत्साहन दिले आहे. आता रणवीर सिंग स्वतःच्या चाहतांच्या अपेक्षांना खरा उतरतो की नाही हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.