Pune News : फँड्री चित्रपटातील ‘शालू’चे बॉलिवूडमध्ये पदार्पण

एमपीसी न्यूज – ‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली ‘शालू’ म्हणजेच अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. ‘पुणे टू गोवा’ चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटात तिने अभिनय केला आहे. अमोल भगत या दिग्दर्शित करत आहेत. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.

या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली असून चित्रपटात कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन पाहायला मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.