Pune : 5 तासात 50 लाखांचा चुना! पुण्यातील तरुणीची सायबर चोरट्यांकडून फसवणूक

एमपीसी न्यूज : मुंबई अँटी नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी बोलत (Pune) असल्याची बतावणी करत तरुणीची तब्बल 5 तासात 50 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीने या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन करण्यात आला त्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 5 जुलै रोजी घडला. फिर्यादी यांना 966875709 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि “आम्ही मुंबई अँटी नार्कोटिक्स ब्युरोमधून बोलतोय, तुमचे पार्सल आले असून त्यात ड्रग्स आहेत आणि तुमच्या वर कारवाई केली जाईल” असे सांगितले.

 

स्काईप लिंक पाठवतो. त्यावर नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी बोलतील असं सांगून सायबर चोरट्यांनी एक बनावट अकाऊंट तयार करून फिर्यादी तरुणीला ऑनलाईन मीटिंग करण्यासाठी बोलावले.

तसेच फिर्यादी आणि त्यांच्या आईचे बँकेचे अकाऊंट वेरिफाय (Pune) करायला लागेल असं सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

 

कारवाई होऊ द्यायची नसेल आणि अकाऊंट वेरीफाय करून द्यायचा असेल तर सांगतो त्या खात्यात पैसे भरा असे सांगितले असता फिर्यादी आणि त्यांच्या आईने मिळून सायबर चोरट्यांच्या खात्यात तब्बल 53 लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे ही सगळी घटना अवघ्या 4 ते 5 तासात घडली

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.