Alandi : कमला एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आज कमला एकादशी निमित्त आळंदी (Alandi) येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

MNS : मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमावर मनसेचा बहिष्कार; कारण…

मंदिरामध्ये एकादशी निमित्त भाविकांना प्रसादाचे (खिचडीचे) वाटप करण्यात आले. हार-फुले प्रसादाच्या तसेच वारकरी साहित्य वस्तूंच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत होती.

अधिक मास निमित्त पवित्र इंद्रायणी नदीमध्ये अनेक भाविक स्नान करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.