MNS : मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमावर मनसेचा बहिष्कार; कारण…

एमपीसी न्यूज – पुणे वनाज ते पिंपरी मेट्रो धावणार (MNS) आहे. पण, पिंपरी-चिंचवडला त्याचा फायदा काय? असा सवाल करत पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम चालू करण्याची मागणी मनसेने केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरातील सर्व नागरिकांच्या मागणीनुसार गेले अनेक दिवसापासून पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी होत आहे.

Pune : रेरा कायद्याने बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पारदर्शकता आली – अजॉय मेहता

या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार वर्ग, महिला वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे शहरात विविध कामासाठी, शिक्षणासाठी जातात.

परंतु, हा मेट्रोमार्ग अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे शहरातील (MNS) नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी.

त्यावर श्रावण हर्डीकर यांनी लवकरच पिंपरी ते निगडीपर्यंतचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सचिन शिगाडे, किरण गवळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.