Cancer Patients: वेदनेवर मात करण्यासाठी स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी केले ढोल ताशा वादन

एमपीसी न्यूज : स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदनेवर ढोल-ताशाचा आवाज हा फुंकर घालतोय हे लक्षात येताच डॉक्टरांनी थेट ढोल-ताशा पथकांशी संपर्क साधला व पथकांनीही पुढाकार घेत रुगणांना त्यांच्या वेदना विसरण्यासाठी सहकार्य केले.

निमित्त होते, आस्था ब्रेस्ट सपोर्ट ग्रुप पुणे व ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र तर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित एका अभूतपूर्व वैद्यकीय सोहळ्याचे. यावेळी उपस्थितांनी स्तन कर्करोग रुग्णांचे ढोल ताशा वादन प्रत्यक्षपणे अनुभवित त्याचे झालेले फायदे देखील जाणून घेतले. या उपक्रमाकरिता ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे.

 

यावेळी पराग ठाकूर म्हणाले, स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महासंघाकडे डॉ.शेखर कुलकर्णी यांनी अशा महिलांना आपण प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती केली.(Cancer Patient) त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ व मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार कलडोणकर यांच्यावर ही जबाबदारी महासंघातर्फे सोपविण्यात आली आणि त्यांनी ती उत्तमरितीने पार पाडली आहे.

Rohit Kharge : ‘रेमिडेसिवीर’चे साईड इफेक्ट! दोन्ही पाय निकामी; नियमित जीम करणा-या पत्रकाराची अवस्था

रुग्णांनीही स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर केलेल्या वैद्यकीय शस्त्रक्रियेचा त्रास दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ढोल-ताशा वादनाचा मंत्र आम्ही स्विकारला आणि आमच्यामध्ये अमूलाग्र बदल घडला.(Cancer Patient) दैनंदिन आयुष्यात आत्मविश्वास आणि उत्साह देखील निर्माण झाल्याचे सांगत स्तन कर्करोग शस्त्रक्रियेनंतर वेदना सहन करणा-या महिलांनी चक्क ढोल-ताशा वादन केले.

डॉ.शेखर कुलकर्णी म्हणाले,  वयवर्षे 40 ते 70 मधील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्यात अमूलाग्र बदल झाला आहे. हाताच्या वेदना कमी होणे, ताजेतवाने वाटणे, रक्तदाब नियंत्रणात येणे, कोणतेही काम करण्यास उत्साह, नैराश्यातून बाहेर पडण्यास बदल असे अनेक चांगले परिणाम वादनाने त्या रुग्णांमध्ये झाले आहेत.(Cancer Patient) त्यामुळे त्यांचे वादन पाहण्यासोबतच अनुभव ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.