Wakad : काळेवाडीमध्ये साडेतेरा हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरटयांनी घरातील साडेतेरा हजारांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 4) सकाळी सहाच्या सुमारास काळेवाडी येथे उघडकीस आली.

प्रियंका चंदन सिंग (वय 23, रा. सहकारनगर, ज्योतिबानगर, काळेवाडी ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियंका यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरटयांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील 13 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.