Chakan : चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 39 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

एमपीसी न्यूज – चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 39 वी वार्षिक सर्व साधारण ( Chakan) सभा संस्थेचे अध्यक्ष सुनील नायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण ( ता. खेड) येथील मिरा मंगल कार्यालयात पार पडली.
संस्थेच्या संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे 15 टक्के लाभांश या सभेत जाहीर करण्यात आला. सभासदांनी अहवाल ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचुन कायम केले. तसेच शासकीय लेखापरीक्षक यांचा अहवाल वाचन केले.  संस्थेस ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झाल्यामुळे आजी माजी संचालक मंडळ आणि सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभासदांना वसुली बाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या सभेस संस्थेचे अध्यक्ष सुनील नायकवाडी, उपाध्यक्ष निलेश टिळेकर,  संचालक नितीन गोरे, अशोक बिरदवडे, गोरक्षनाथ कांडगे, लक्ष्मण वाघ, राहुल परदेशी, नवनाथ शेवकरी, सुरेश कांडगे, गिरीश गोरे, बाळासाहेब साळुंके, प्राजक्ता गोरे व साधना गोरे, तज्ञ संचालक प्रकाश भुजबळ, निलेश जाधव , सल्लागार अंकुश पवार, नितीन बोत्रे, सुभाष गोरे यांच्यासह संस्थेचे माजी सर्व संचालक, सभासद (Chakan) उपस्थित होते.

दिपप्रज्वलन व संस्थेचे संस्थापक स्व. गुलाबराव गोरे, मा. आ. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे प्रतिमा पुजन करून सभेस सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सचिव अनिल धाडगे यांनी केले. सभेस बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, माजी नगराध्यक्ष मंगला गोरे, माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, मीना गोरे, बिपीन रासकर, रत्नेश शेवकरी, विशाल बारवकर, अस्लमभाई सिकीलकर, अमृत शेवकरी, महेश शेवकरी, सचिन पानसरे, राम शेवकरी, मुकुंद धायबर, रमेश गोरे, सुन्नाअप्पा सिकीलकर, शांताराम आगरकर ( Chakan) आदी उपस्थित होते.

गौरव पुरस्कार तिघांना प्रदान 

समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मालिका सिकीलकर, पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रामचंद्र आवटे आणि धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे बंडोपंत ढेंबे यांना स्व. आ. सुरेश गोरे यांच्या स्मरणार्थ गौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन गोरे , बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे कालिदास वाडेकर व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार ( Chakan) वितरण करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.