Khed : पैशांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील कुरुळी येथील एका (Khed) व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. हा प्रकार 24 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत कुरुळी ( ता. खेड ) येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित अपहरण झालेल्या मुलाचा खून झाल्याची बाब समोर आली आहे.

खेड तालुक्यात निमगाव (ता. खेड) येथे निर्जन ठिकाणी अस्थिपंजर झालेला संबंधित तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे.

सचिन हरिराम यादव (वय 19 रा.डोंगरे वस्ती कुरुळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गोरख जनार्दन फल्ले (वय 32, रा. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रोहित शिवाजी नागवसे (रा. केज, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही पोलिसांनी मुंबई ( ठाणे ) येथून ताब्यात घेतले आहे.

कुरुळी येथील व्यावसायिक हरिराम यादव यांचा मुलगा सचिन 24 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीत गेला. तो रात्री पर्यंत घरी न आल्याने व्यावसायिकाने कंपनीत जाऊन पाहणी केली असता मुलगा तिथे दिसला नाही.

तसेच कंपनीची कार आणि दुचाकी देखील दिसली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानंतर व्यावसायिकाचा मुलगा वापरत असलेली दुचाकी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे बेवारस मिळून आली. पोलिसांनी व्यावसायिकाच्या कंपनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कंपनीच्या मागील बाजूला राहणारा आरोपी रोहित (Khed) याच्यासोबत व्यावसायिकाचा मुलगा एका हॉटेलमध्ये जेवण करत होता.

त्यानंतर रोहित देखील बेपत्ता होता. त्यामुळे रोहित आणि त्याच्या साथीदाराने व्यावसायिकाच्या मुलाचा घातपात करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Chakan : व्यावसायिकाचे अपहरण करून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक

पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर यादव कुटुंबियांकडून पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाचे अपहरण करून खेड तालुक्यात निमंगाव येथे नेऊन निर्जन ठिकाणी दारू पाजून डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर गोरख फल्ले यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता असद घटनेचा उलगडा झाला आहे. यातील दुसरा आरोपी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मुंबई ( ठाणे ) परिसरात किन्नर बनून राहत होता. पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे.

खून झालेल्या तरुणाचा अस्थिपंजर सांगाडा निमगाव हद्दीत मिळून आला असून तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.