Chakan : एआरएआयच्या वतीने चाकण येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एमपीसी न्यूज – ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने ( Chakan) येत्या बुधवार (दि. 31) ते शुक्रवार (दि. २ जून) दरम्यान चाकण येथील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर अर्थात एआरएआय-एचटीसी येथे ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’(एएम अँड एम 2023) या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एआरएआयचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या तिसऱ्या परिषदेनंतर यावर्षीची परिषद ही एआरएआय – चाकण येथे प्रत्यक्ष स्वरुपात संपन्न होणार आहे. एसएई इंडिया आणि एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे, एआरएआयच्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या समन्वयक  मेधा जांभळे आदी मान्यवर या वेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Khadki : खडकीत खुन्नसने काय बघतो म्हणत एकावर चाकूने वार

 

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. रेजी मथाई म्हणाले, शेपिंग प्रोग्रेसिव्ह मोबिलिटी थ्रू इमर्जिंग मटेरिअल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना असून सध्या वाहन उद्योग क्षेत्र हे इंधनाच्या कार्यक्षमतेतील सुधारणा, वजनाने हलकी वाहनांची संरचना, आवश्यक सुरक्षितता, पर्यावरणावरील परिणाम, उत्पादन विकास चक्रात होणारी घट, ई-मोबिलिटी सारखे मोबिलिटी सोल्यूशन यांसाठी प्रयत्नशील आहे. आज काळाची गरज असलेल्या आत्मनिर्भरतेच्या अर्थात स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे दोन्ही घटक वाहन व्यवसायासातही महत्त्वाचे आहेत.

हेच लक्षात घेत एआरएआयच्या माध्यमातून आम्ही मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याद्वारे या क्षेत्रातील प्रमुख आणि तंत्रज्ञ एकत्र येत एकाच व्यासपिठावर नाविन्यपूर्ण संकल्पना, तंत्रज्ञान, उपाय, आव्हाने इत्यादींवर चर्चा करतील.

याशिवाय परिषदेत अॅडव्हान्स मटेरियल, प्लॅस्टिक व कंपोझिट, उत्पादन प्रक्रिया, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ई-मोबिलिटी, डिझाईन व सिम्युलेशन, एआय व एमएल यांसारख्या विविध विषयांची अलीकडील काळात झालेली प्रगती यावर देखील चर्चा करण्यात येईल, असेही डॉ मथाई यांनी नमूद केले.

देशातील वाहन उद्योगाच्या प्रगतीविषयी बोलताना डॉ मथाई म्हणाले, “आज जागतिक स्तरावर भारतीय वाहन उद्योगाने उत्पादन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. उत्पादन क्षेत्रात आता भारताच्या पुढे फक्त अमेरिका आणि चीन हे दोन देश आहेत. दुचाकी व ट्रक्टर निर्मितीत मात्र भारत पहिल्या क्रमांकावर आहे. उत्पादन क्षेत्रात भारताची अशी आगेकूच सुरु असताना वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीतही भारतीय उद्योगाने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचा तो निर्णय अखेर मागे

त्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएलआय अर्थात प्रोडक्ट लिंक्ड इन्सेन्टिव्ह या योजनेने चांगला हातभार लावल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शंभरहून अधिक सुट्या भागांचा अंतर्भाव केला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आयात केल्या  जाणाऱ्या सुट्या भागांना भारतीय बनावटीचा पर्याय देण्यात आला आहे.”

एआरएआय च्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या संयोजिका मेधा जांभळे यावेळी म्हणाल्या, “या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये वाहनउद्योग क्षेत्र, संशोधन व विकास संस्था (आर अँड डी), शैक्षणिक क्षेत्र यामधील 20 हून अधिक तज्ज्ञांची बीजभाषणे, चर्चासत्रे यांचा समावेश असणार आहे. याबरोबरच मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित 15 तांत्रिक सत्रांत 40 हून अधिक तांत्रिक पेपर्स देखील सादर केले जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समूह अध्यक्ष डॉ. अजित सप्रे, इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ एस ए इलानगोवन, डीआरडीओचे डॉ बी प्रवीणकुमार, टाटा मोटर्स चे श्रीपादराज पोंक्षे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रो अलंकार आदी मान्यवर या वेळी उपस्थित असणार आहेत.”

ई-मोबिलिटी मध्ये साहित्य आणि उत्पादने, प्लॅस्टिक आणि कॉम्पोझिट मटेरिअल, इंडस्ट्री 4.0, एआय/ एमएल, सरफेस कोटिंग आणि प्रोसेसिंग, मटेरियल मॉडेलिंग आणि सिम्युलेशन अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार असून ‘मटेरियल्स फॉर सस्टेनेबल मोबिलिटी’ या विषयावर होणारे चर्चासत्र हे या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार असून यामध्ये तज्ज्ञ, सीटीओज्, संशोधक आणि वैज्ञानिक आपले विचार मांडतील असे सांगत मेधा जांभळे पुढे म्हणाल्या की, वाहन उद्योग क्षेत्रातील भविष्यवेधी तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग डेटा अॅनालिटिक्स इन मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर देखील एका विशेष चर्चासत्राचे आयोजन परिषदेत करण्यात आले आहे.

यामध्ये सहभागी तज्ज्ञ या तंत्रज्ञानावर त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडतील. एआरएआय चाकण येथे परिषदेच्या ठिकाणी एक प्रदर्शन देखील आम्ही आयोजित केले असून या ठिकाणी वाहन उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान आणि विकास यांच्याशी संबंधित 25 स्टॉल्स देखील असणार ( Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.