Talegaon Dabhade : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली किशोर आवारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

एमपीसी न्यूज – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि.18) दुपारी आवारे (Talegaon Dabhade)  यांच्या तळेगावातील निवासस्थानी भेट दिली. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि.12) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी आवारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

रवींद्र चव्हाण यांनी आवारे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सांत्वन करताना रवींद्र चव्हाण भावूक झाले होते.

Chakan : एआरएआयच्या वतीने चाकण येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

यावेळी किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे,पत्नी विद्या आवारे,भाऊ रवींद्र आवारे,सुरेखा आवारे,मुलगी प्रियंका आवारे,मामा उद्योजक बाळासाहेब काकडे व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्यासह नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

मंत्री चव्हाण यांनी याप्रकरणी गृहमंत्र्यांशी बोलून, आवारे कुटूंबीयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आवारे यांच्या निवासस्थानातून चव्हाण बाहेर पडल्यानंतर स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या सदस्यांनी न्याय देण्याची मागणी केली.किशोरआवारे हे गरिबांचे कैवारी होते. आमचे ते दैवत होते. न्याय द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी (Talegaon Dabhade) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.