Khadki : खडकीत खुन्नसने काय बघतो म्हणत एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज-खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Khadki)  एका अठरा वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले. अगदी किरकोळ कारणावरून या तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अरबाज मुनीर शेख या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPC News Podcast 19 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  फिर्यादी  घरातील साहित्य घेण्यासाठी बाहेर पडला होता. यावेळी आरोपींनी खुन्नसने बघतो असा गैरसमज करून घेतला. त्याला शिवीगाळ करत आरोपींनी मारहाण केली.

त्यातील एकाने खिशातील चाकू काढून फिर्यादी यांच्या छातीच्या मधोमध वार केला. यामध्ये फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Khadki) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.