Chakan : लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करता भरधाव वेगात कारमधून जाणाऱ्या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करता विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तिघांवर म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) निघोजे-तळवडे पुलाजवळ करण्यात आली.

मयूर शांताराम चोरगे (वय 20), रजनीकांत बाळासाहेब काळोखे, देवेंद्र प्रभाकर गाडे (वय 29, सर्व रा. देहूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नवले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या एम एच 12 / ए झेड 4982 या कारमधून विनाकारण फिरत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या विनाकारण बाहेर फिरण्यावर बंदी आली आहे. असे असताना देखील आरोपींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क न लावला नाही.

तसेच स्वतःच्या व इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने बेदरकारपणे कार चालवली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.