Chakan Crime : दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज – स्टोव्ह आणि किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत पती, दीर आणि जावू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमालउद्दीन महमद पठाण (वय 45), रफिक महंमद पठाण (वय 52), सुरया रफिक पठाण (वय 45, रा. खंडोबामाळ, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 36 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी जमालउद्दीन हे पती-पत्नी आहेत. त्यांचा विवाह 2004 साली झाला. विवाहानंतर 15 दिवसांपासून जमालउद्दीन याने स्टोव्ह दुकानासाठी 20 हजार रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून त्याने विवाहितेला दारू पिऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी 20 हजार रुपये आरोपीला दिले.

त्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी आणखी 25 हजार रुपये दिले. तरीही आरोपीने किराणा दुकान सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये आणण्याची मागणी केली. ‘माहेरच्या लोकांची परिस्थिती खराब असल्याने पैसे मागू नका’ असे विवाहितेने आरोपींना समजावून सांगितले. मात्र विवाहितेला घरातून हाकलून देण्याची धमकी देत पुन्हा स्टोव्ह आणि किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.