Chakan Crime : कोणतेही अधिकार नसताना गाळा विकत केली फसवणूक

एमपीसी न्यूज- बांधकामाच्या (Chakan Crime) खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकार नसताना गाळा विकला. त्यानंतर गाळा न देता फसवणूक केली. ही घटना 7 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.

सचिन मोहन शेवकरी (वय 45, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC Property : थकबाकीदारांचे धाबे दणाणले! मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात; 21 मालमत्ता जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याने (Chakan Crime) किरण सूर्यकांत शेवकरी यांचे सहा मजली इमारत बांधकामासाठी घेतली होती. त्या बांधकामामध्ये सचिन याला खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकार नव्हते. त्याला बांधकामासाठी 200 चौरस फूट इमारत बांधण्यासाठी अपुरी पडत असल्याने त्याने फिर्यादी सोबत करारनामा करून जागेच्या बदल्यात इमारतीमध्ये एक गाळा देण्याचे आमिष दाखवले. इमारतीमध्ये फिर्यादीस गाळा न देता फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.