Chakan Crime News : पिस्टल विक्री करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या दोघांना अटक; तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिस्टल विक्री करणाऱ्या एकाला आणि त्याच्याकडून पिस्टल विकत घेतलेल्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांसह पिस्टल विक्री करणाऱ्या आरोपीच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद उर्फ अंकित किशनराव भसके (वय 25, रा. चाकण), अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (रा. नाणेकरवाडी, ता. खेड), दत्तात्रय सूर्याजी कडूसकर (वय 34, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील प्रमोद आणि दत्तात्रय या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद आणि अक्षय यांनी विक्रीसाठी पिस्टल आणले असून प्रमोद पिस्टल विक्रीसाठी नाणेकरवाडी येथील आळंदी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून प्रमोद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केली. तो पिस्टल विक्रीसाठी आला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

तसेच आरोपी प्रमोद आणि त्याचा साथीदार अक्षय या दोघांनी चार पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी आणली होती. त्यातील एक पिस्टल आणि तीन काडतुसे दत्तात्रय कडूसकर याला विकले आहे. एक पिस्टल आणि काडतुसे साथीदार अक्षय पाटील याच्याकडे आहे. तर दोन पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी आणले असल्याचे प्रमोद याने पोलीस तपासात सांगितले.

आरोपी अक्षय पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. तो सध्या फरार आहे. त्याच्या विरोधात 10 गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.