Chakan Crime News : कंपनीतून सव्वा दोन लाखांचे स्पेअर पार्ट चोरीला 

एमपीसी न्यूज – कंपनीच्या पाठीमागचा पत्र्याचा दरवाजा तोडून सव्वा दोन लाखांचे स्पेअर पार्ट चोरीला गेले आहेत. शुक्रवारी (दि. 23) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास म्हाळुंगे, चाकण याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अनिरुद्ध अनिल बेलन (वय 38, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कंपाऊंडवरुन उडी मारुन कंपनी परिसरात प्रवेश केला. आरोपींनी कंपनीच्या पाठीमागचा पत्र्याचा दरवाजा तोडून दोन लाख 24 हजार 692 रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चिटपल्ले करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.