BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे घराचे फ्लॅटचे कुलूप तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 83 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 5) पहाटे उघडकीस आली.

लहू कुंडलिक आनंत्रे (वय 29, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लहू रिक्षा चालवण्याचे काम करतात. ते कडाचीवाडी येथे किरण झिंजूर्के यांच्या भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी रात्री लहू त्यांच्या घराजवळ असलेल्या रॉयल सोसायटीमध्ये कुटुंबासह झोपायला गेले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी लहू यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून 60 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 23 हजार 500 रुपयांची रोकड असा एकूण 83 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3