Chakan : चाकूच्या धाकाने दुचाकीस्वार तरुणाला लुटले; दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला दोन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. दुचाकीस्वार तरुणाकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 49 हजार 240 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी चारच्या सुमारास वासुली फाटा ते सावरदरी रोडवर घडली.

अक्षय विजय कुमार भळगट (वय 21, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वासुली फाटा ते सावरदरी रोडने दुचाकीवरून (एम एच 14 / ईझेड 4050) जात होता. रस्त्यात दोन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवले. चाकूचा धाक दाखवत ‘गप्प बस नाहीतर तुला दाखवतो’ असे म्हणून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 1 लाख 39 हजार 240 रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 49 हजार 240 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.