Mobile theft : पोलीस चौकीत नेण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरला

एमपीसी न्यूज : पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी तुला बोलावल आहे म्हणत एका कामगाराचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे.(Mobile theft) हा प्रकार चाकण नगरपरिषद चौकात शनिवारी (दि.3) घडला आहे.

याप्रकरणी अमर वंसतराव पवार (वय 34 रा. वरखरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjewadi Crime : जुन्या भांडणाच्या रागातून विद्यार्थ्यावर जीवघेणे वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. ते शनिवारी चाकण येथील तळेगाव चौक येथे आले असता आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला सांगितले की, तुझ्या बायकोने तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .तुला आता आम्ही चौकीला घेऊन जाणार आहोत.(Mobile theft)  यावेळी फिर्यादीही त्यांच्या बरोबर जाण्यास तयार झाले. ते तिघे चालत नगरपरिषद चौका जवळ आले असता त्यातील एकाने त्यांच्या खिशातील 10 हजार रुपयांचा मोबाईल चोरला व दोघे पळून गेले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.