Chakan : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्युज – पत्नीशी घटस्फोट घेतो आणि त्यानंतर तुझ्याशी लग्न (Chakan) करतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर महिलेचा दोघांनी संमतीने गर्भपात केला. हा प्रकार 26 जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत चाकण येथे घडला.

विकी विजय केळकर (वय 31, रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये सानेगुरूजी कथामाला व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा संपन्न

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला ‘पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर तुझ्याशी लग्न करतो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान फिर्यादी तीन महिन्यांच्या गरोदर राहिल्या. फिर्यादी आणि आरोपी दोघांनी संमतीने गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.