Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये सानेगुरूजी कथामाला व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज  – कलापिनीमध्ये नुकत्याच सानेगुरूजी कथामाला, समर्थ सेवा मंडळ आणि कलापिनी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यामाने समर्थ रामदास स्वामी रचित (Talegaon Dabhade)  मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा शालेय विद्यार्थ्याच्या 5 गटात आणि खुल्या गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेचे हे 29 वे वर्ष होते. या वर्षी विविध गटातील 325 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेचच  पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण नटराजपूजनाने आणि नंतर सानेगुरूजी लिखित “खरा तो हाची धर्म” या सौ रश्मी पांढरे, दिप्ती आठवले आणि विनया मायदेव यांनी सुरेल आवाजात गायन केलेल्या प्रार्थनेने करण्यात आली.

Hinjawadi : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

आपल्या प्रास्ताविकात श्री. रविंद्र पांढरे यांनी 1995 साली तळेगावात स्थापन झालेल्या साने गुरूजी कथामाला यांनी प्रथम 1995 साली सुरू केल्या व नंतर 2004 मध्ये कलापिनी सांस्कृतिक केंद्र व 2017  मधे समर्थ सेवा मंडळ यांनी पण सहकार्य करण्यास सुरवात केली .तसेच या स्पर्धेसाठी श्री. मोरेश्‍वर होनप यांनी पत्नी कै .मंगला होनप आणि सौ. विनया मायदेव यांनी आपल्या मातोश्री कै.शिंत्रे यांच्या स्मरणार्थ स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केल्याचे सांगितले. त्यानंतर समर्थाच्या साहित्याच्या गाढया अभ्यासकश्रीमती मृदुला कुलकर्णी आणि सौ. पिनाकी बर्गे यांचा परिचय सौ. विनयामायदेव यांनी करून दिला.

प्रमुख अतिथी श्रीमती ललिता जोशी यांचा परिचय श्री.मोरेश्‍्वर होनप यांनी करून दिला . तसेच दुसरे प्रमुख पाहुणे श्री .राजीव शिंदे यांचा उद्योग लक्ष्मीचे उपासक असे सांगून डॉ.अनंत परांजपे यांनी करूनदिला . नंतर मान्यवरांचा गौरव करण्यात आला . आपल्या मनोगतात परिक्षिका श्रीमती मृदुला कुलकर्णी यांनी ही स्पर्धा अत्यंत अटितटीची झाल्याचे सांगितले.

शिंदे यांनी असे धार्मिक आणि सुसंस्कार विद्यार्थ्यावर करण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले . श्रीमती ललिता जोशींनी विद्यार्थ्याना आणि पालकांना हे श्लोक वर्षभर पाठ करून पुढील वर्षी पुन्हा भाग घेण्यास प्रात्साहन दिले . तसेच मनाचे शलोक कसे आपल्या व्यक्तिमत्वात चांगले बदलघडवून देतात हेही सांगितले .

नंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यातआले. विनया मायदेव यांनी आभार प्रदर्शन केले तसेच  स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ.मीरा कोचूर व सौ. भाग्यश्री हरहरे यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन सौ. एरंडे, श्रीमती ज्योती ढमाले, विशाखा देशमुख, मनिषा शिंदे या सर्व बालभवनच्या प्रशिक्षिकांनी आणि दिपक जयवंत, रामचंद्र रानडे, सुरेश भोईर, श्री.चेलूप्रसाद, जयराम संपत, रूपाली पाटणकर, गीता संपत, छाया हिंगमीरे या सर्वानी परिश्रम (Talegaon Dabhade) घेऊन केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.