Hinjawadi : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – गाडीला कट मारून एक कार पुढे जाऊन थांबली. त्यानंतर (Hinjawadi)  त्या कार मधील चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाच वाजता सुसगाव कमानीजवळ घडली.

Pune : दक्षिण कमांडच्यावतीने 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा

सचिन पांडुरंग चांदेरे (वय 29, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/डीएन 3751 या कार मधील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार मधून आईला घेऊन घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कारने फिर्यादी यांच्या कारला कट मारला. त्यानंतर आरोपी पुढे जाऊन थांबले. फिर्यादी यांची कार अडवून फिर्यादीस बेदम मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत (Hinjawadi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.