Chakan : ट्रकखाली सापडून महिलेचा मृत्यू

ही घटना 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास म्हाळुंगे - चाकण रोडवर घडली. : Woman found dead under truck

एमपीसी न्यूज – ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणारी महिला खाली पडली. त्यानंतर ट्रकचे चाक डोक्यावरून  गेल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास म्हाळुंगे – चाकण रोडवर घडली.

लता तुकाराम दौंडकर (वय 40, रा. खराबवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी लता यांचा भाऊ बाळासाहेब यशवंत हजारे (वय 45, रा. कनेरसर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित कुमार लखराज सिंह (वय 42, रा. झारखंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण लता आणि त्यांचा मुलगा विशाल हे दोघेजण डिस्कव्हर दुचाकीवरून (एमएच 14 / ईआर 3602) वाघजाईनगर येथून म्हाळुंगे ते चाकण या रोडने जात होते. विशाल दुचाकी चालवत होता.

त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील 14 टायरच्या अवजड ट्रकने दौंडकर यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे लता आणि त्यांचा मुलगा विशाल दोघेही रस्त्यावर पडले.

त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या लता यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.