Pune : खडकवासला धरणातून 428 क्युसेक वेगाने विसर्ग : महापौर

खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. : Discharge from Khadakwasla Dam at a speed of 428 cusecs: Mayor

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्गाचा वेग 428 क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी पुणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांत सध्या 18.63 टीएमसी म्हणजेच 63.91 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच कालावधीत या चारही धरणांत 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. मागील 8 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

खडकवासला धरणाची क्षमता केवळ 1.75 टीएमसी असल्याने हे धरण लवकर भरते. त्यामुळे या धरणातून सध्या 428 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

या धरणांत आता 18 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टाळले आहे.

तर, आता शेतीसाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणखी जोरदार पाऊस सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.