Khed : दारूच्या नशेत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत बंधाऱ्यात पोहण्यासाठी (Khed)  गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी खेड तालुक्यातील आडगाव बंधारा येथे घडली.

सावळा बाळू मेदे (वय 24, रा. आडगाव, ता. खेड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. सावळा आणि त्याचे मित्र बाबू पोपट पवार (वय 22), संदेश बाळू केवाळे (वय 21) हे आडगाव येथे मारुती गोपाळे यांच्याकडे मांडव बांधण्याच्या कामासाठी गेले होते. मांडव बांधून जेवण करण्यासाठी दुपारी घरी जात असताना सावळा बंधाऱ्यात अंघोळ करण्यासाठी गेला.

Chakan : जमिनीच्या वादातून भावाला बेदम मारहाण

त्यावेळी सावळा हा दारू पिलेला होता. तो पोहत पोहत बंधाऱ्यात लांब पर्यंत गेला. तिथे दम लागल्याने तो बुडाला. बराच वेळ तो पाण्यातून बाहेर न आल्याने दोन्ही मित्र घरी निघून गेले. (Khed) त्यानंतर एक वाजताच्या सुमारास एक महिला कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेली असता एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.