Pimpri : उन्हाळ्यात ऊर्जा देणाऱ्या रसाळ फळांना मागणी

एमपीसी न्युज :  उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जाही कमी होते. (Pimpri) परिणामी थकवा व अशक्तपणा जाणवतो. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे तपतपत्या उन्हात शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिक फळाच्या रसाना पसंती देत आहेत. मोसंबी, डाळींब, काळे व हिरवे द्राक्ष, कलिंगड (टरबूज), खरबूज, अननस आणि आंबे या मधूर चव असलेल्या रसदार फळांना मागणी वाढलेली दिसत आहे.

उन्हाळी फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने राहते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच उन्हाळी फळांचे सेवन, त्यांचा रस घेणे आवश्यक आहे.  फळांची वाढती मागणी लक्षात घेता शहरात विविध ठिकाणी फळ विक्रीते दाखल झाले आहेत. उन्हाळा सुरु होताच रसदार फळांना मागणी वाढते.

Khed : दारूच्या नशेत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शहरात उन्हाचा पारा इतका वाढला आहे. त्यामुळे उन्हापासुन शरीराला थंडावा देणारी फळे बाजारात दाखल झाली आहेत. सध्या बाजारात  रसदार फळाना आधिक मागणी दिसत आहे. त्यामध्ये कलिंगड , तसेच खरबुजाला आधिक पसंदी देताना नागरिक दिसत आहे. (Pimpri) तसेच डाळिंब , द्राक्षे, चिकु , पपई, नारळ, अननस, नारळ पाणी, इत्यादी फळं बाजारात उपलब्ध आहेत.  त्यामुळे उन्हाळ्यात निरोगी आहारासाठी फळे खाणे गरजेचे आहे. उन्हाळी फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच ग्लुकोज, जीवनसत्त्व, खनिजही भरपूर प्रमाणात असतात. असा सल्ला आहारतज्ज्ञकडुन दिला जात आहे .

उन्हाळयाच्या दिवसात फळांना आधिक पसंदी दिली जाते.(Pimpri) उऩ्हाळ्याच्या दिवसात फळ खिशला परवडणाऱया दरात उपल्बध असल्यामुळे बाजारात रसाळ फळे खरेदी करताना नागरिक दिसत आहे. तसेच शहरात विविध भागात फळ विक्रीत्यांच्या हातगाडया दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.