Chandrakant Patil : माझ्या कार्यक्रमात फटाके फोडले तर मी तसाच निघून जाईन; वायफळ खर्चावर पालकमंत्र्यांची कानउघडणी

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. गुरुवारी त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत 100 नगरसेवक निवडून आले, तरच भाजपने पुणे महापालिका जिंकली असं मी मानेन. 99 नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईलच. परंतु, भाजपने महापालिका जिंकली असं मी कधीच म्हणणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले.
यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, अशा प्रकारच्या सण-समारंभात वेळही जातो आणि पैसाही खर्च होतो या मताचा मी आहे. यापुढे माझ्या कुठल्याही कार्यक्रमात फटाके वाजवण्यास मी तसाच गाडीत बसून परत निघून जाईल.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील अडीच वर्षाच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी खूप त्रास दिला. तरीही भाजपचे अनेक कार्यकर्ते टिकून राहिले. महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचे अनेक निर्णय रद्द करून खुन्नस काढण्याचे काम केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन सातत्याने सुरू होते. आणि ते शेवटी खरे ठरले. आता आपले सरकार आले आहे, खूप काम करायचे आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड मेट्रो आदी कामासाठी 18 ते 20 तास काम करण्याची तयारी सर्वांनीच ठेवावी असे आवाहन त्यांनी केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.