Madhuri Misal : पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत

एमपीसी न्यूज : पालकमंत्री झाल्यानंतर पुणे शहर भाजपच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. कार्यकर्ता मोठा झाला तर आपल्याला नुकसान होईल म्हणून सच्चा कार्यकर्त्याला तुमच्यापर्यंत नेतेमंडळी पोहोचू देत नाहीत असं त्या म्हणाल्या. माधुरी मिसाळ यांनी केलेल्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी ही टाळ्यांचा कडकडाट केला. 
माधुरी मिसाळ म्हणाल्या, राज्यात आता भाजपचे सरकार आले आहे. विविध महामंडळावर आता आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या अशी मागणी करत त्यांनी शहरातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना पोहोचू देत नाहीत अशी खंत देखील व्यक्त केली. सच्चा कार्यकर्ता मागे राहत असून त्याला न्याय द्या अशी मागणी ही मिसाळ यांनी यावेळी केली.

राज्यात भाजपचे सरकार नसताना जे कुंपणावर (Madhuri Misal) होते, त्यांनाही लक्षात ठेवा आणि आगामी महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.