Tukaram Mundhe :आरोग्य विभागाचा चार्ज घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, डॉक्टरांना दिला निलंबनाचा इशारा

एमपीसी न्यूज : तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे शिस्तबद्ध आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी आपल्या कामाने ते ओळख निर्माण करतात. आणि नोकर वर्गावर त्यांचा दबदबा असतो. तर याच तुकाराम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. 

आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

त्यांनतर तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात झाली आहे.

Madhuri Misal : पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत

रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यास निलंबनाची (Tukaram Mundhe) कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी. तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.