Maval News : वृद्ध व्यक्तींकरीता कोविड 19 चे लसीकरण त्वरीत करण्यात यावे – किरण म्हाळसकर 

एमपीसी न्यूज – वयोवृद्ध व्यक्तींकरीता कोविड 19 चे लसीकरण त्वरीत करण्यात यावे अशा आशयाची मागणी वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक किरण म्हाळसकरसह माजी नगरसेवक अ‍ॅड विजय जाधव उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव मावळ येथील ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती मावळ येथे लसीकरण चालु आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात. रांगेमध्ये तरुण, महीला आणि पुरुष उभे असतात, त्याच रांगेमध्ये ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल असल्याने रांगेमध्ये जास्त वेळ उभे राहु शकत नाहीत. अशा 65 वर्षावरील नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर अशा नागरिकांना रांगेमध्ये उभे न करता त्यांचे त्वरीत लसीकरण करून त्यांना योग्य ते सहकार्य करण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.