Charholi : च-होली खुर्दमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला विविध कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

  एमपीसी न्यूज – च-होली खुर्द येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या (Charholi)  कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल दि.10 रोजी संध्याकाळी पार पडला.

1)आळंदी मरकळ रोड ते नानाश्री लॉन्स ते विश्रांतवड रस्ता करणे मंजूर निधी पन्नास लाख,2)आळंदी ते च- होली खुर्द रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी पंधरा लाख,3)आळंदी वडगांव रोड ते सुरेश नगर रस्ता डांबरी करण करणे मंजूर निधी वीस लाख,4)ठाकर वस्ती रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,5) स्वामी समर्थ नगर काँक्रिटीकरण मंजूर निधी वीस लाख रूपये,6)लक्ष्मीनगर( विश्रांतवड) येथील रस्ता करणे मंजूर निधी दहा लाख रुये,7)ग्रामीण आळंदी रस्ते काँक्रिटीकरण करणे (च – होली खुर्द) मंजूर निधी सत्तर लाख रुपये,8) भामणेर धर्मशाळा परिसर बंदिस्त गटर मंजूर निधी दहा लाख रुपये,9)नानाश्री लॉन्स ते मरकळ रोड बंदिस्त गटर मंजूर निधी पंचवीस लाख रुपये ,10)दिलीप कुऱ्हाडे वस्ती ते ठाकर वस्ती रस्ता काँक्रीट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,11)पसायदान नगर राममंदिर(रस्ता) मंजूर निधी तीस लाख रुपये,12) बन्सीलाल गोडाऊन रामकृष्ण नगर (रस्ता)मंजूर निधी दहा लाख रुपये,13) च -होली बायपास रोड  मंजूर निधी पन्नास लाख रुपये इ. एकूण कामांना  3 कोटी 30 लाख रु.निधी मंजूर झालेला आहे.

Pune : समाजात आजही स्त्री-पुरुष समानतेचा अभाव – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

 तसेच च- होली खुर्द येथे झालेल्या विविध विकास  कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी मान्यवर पदाधिकारी अरुणशेठ चौधरी,कैलास लिंभोरे ,विलास कातोरे,राजाराम लोखंडे ,भरतशेठ कड, अनिकेत कुऱ्हाडे ( वि.वि.सो. चेअरमन व  च-होली खुर्द  ग्राम पंचायत सदस्य),आजी माजी सरपंच उपसरपंच,  ग्राम पंचायत सदस्य,चेअरमन – मा.चेअरमन व च – होली खुर्द ग्रामस्थ मान्यवर  (Charholi)  उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.