Chattushringi : 16 वर्षीय विद्यार्थिनीला कामसूत्राचे फोटो दाखवले; शिक्षकाला बेड्या

एमपीसी न्यूज : पेंटिंग शिकण्यासाठी (Chattushringi) येणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकानेच कामसूत्राचे फोटो दाखवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या पाषाण परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेश नानासाहेब पवार (वय 49) याला अटक करण्यात आली आहे.
Pimpri News: न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार; कामगारांचा निर्धार
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाण परिसरात आरोपी निलेश पवार याचा आर्ट स्टुडिओ आहे. पीडित तरुणी या स्टुडिओमध्ये पेंटिंगचे शिक्षण घेण्यासाठी येत होती. या शिक्षकाने ‘तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु’ म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच, तिला कामसुत्राचे फोटो दाखवून तिचा विनयभंग (Chattushringi) केला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शिक्षक पवार याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.