Pimpri : टास्कच्या बहाण्याने महिलेची फसवणूक 

एमपीसी न्यूज – टास्कच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत मोरवाडी पिंपरी (Pimpri) येथे घडली.

AAP : नरेंद्र मोदी हे फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत – आप खासदार संजय सिंह

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुश, येरीअल, एक महिला आणि 9610469161 या व्हाटस अप धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादिसोबत व्हाटस अप द्वारे संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यास भाग पाडले. टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 35 हजार 700 रुपये भरण्यास सांगत त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.