AAP : नरेंद्र मोदी हे फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत – आप खासदार संजय सिंह

एमपीसी न्यूज : भाजपाने जनतेला (AAP) एकमेकांशी जातींच्या आधारे लढवण्याचे काम केले. तर दुसर्‍या बाजूला अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे. आकाशात गेले विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे नरेंद्र मोदी फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत. अशा शब्दात आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका केली.

पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नाना पेठ येथे आपकडून महासंकल्प जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह हे बोलत होते.

यावेळी राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, धनंजय शिंदे, संघटक मंत्री अजित फाटके, संदीप देसाई, नविंदर अहलुवालिया, रियाज पठाण, अजित खोत, हनुमंत चाटे, मनिष मोडक, भूषण धाकुलकर, राज्य मिडिया प्रमूख चंदन पवार, सोशल मिडिया प्रमूख कनिष्क जाधव, मुकुंद किर्दत हे पदाधिकारी उपस्थित होते.

Pimpri : साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’चे शुक्रवारी ज्ञानपीठाकर मावजो यांच्या हस्ते प्रकाशन

यावेळी खासदार संजय सिंह म्हणाले की, दिल्ली आणि पंजाबमध्ये जे परिवर्तन झाले आहे. आता महाराष्ट्रात देखील नक्की परिवर्तन होणार आहे. हा माझा विश्वास आहे. आम आदमी पार्टीने मोठ मोठ्या पार्टीना घाम फोडण्याचे काम केले आहे.

शेतकऱ्याचा मुलगा मुलगी ही (AAP ) आप पक्षातून आमदार आणि खासदार बनू शकतात. दिल्लीने आम आदमीचे जीवन बदलेले आहे. तर नरेंद्र मोदींना फक्त ईडी सीबीआयच्या जीवावर सरकार बनवायची सवय लागली आहे. भाजपाच्या सरकारमध्ये शेतकरी आज चिंतेत आहे.

आम आदमी महागाईने खाईत लोटला गेला आहे. भाजपाच्या डोक्यात गेलेली सत्तेची लालसा आपल्याला झाडूने साफ करायची आहे. तसेच आता आगामी काळात आम आदमी पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा देखील यावेळी त्यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.