Pimpri : साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’चे शुक्रवारी ज्ञानपीठाकर मावजो यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’ या दोन (Pimpri) महत्वपूर्ण व अमुल्य ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकर दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.15) सायंकाळी 4 वाजता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृह, पिंपरी येथे होणार आहे.

यावेळी पिंपरी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे या दोन्ही कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्याच पुढाकाराने हे अमुल्य ग्रंथ प्रकाशित होत आहेत.

Chinchwad : ‘चिंचवड’मधील मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे विशेष अतिथी म्हणून तसेच जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

अमळनेर येथे फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय (Pimpri) मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा विशेष सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते या वेळी होणार आहे. ग्रंथांच्या प्रकाशनाबरोबरच ई-बुक व संमेलनांच्या यू-ट्यूब चॅनल्सचे लोकार्पण देखील याप्रसंगी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.