Mahalunge : मुंबई रेल्वे पोलिसांची स्क्रॅपमधील रुग्णवाहिका विकू पाहणाऱ्यावर गुन्हा, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज- उपायुक्त मुंबई रेल्वे पोलीस कार्यालय यांच्या  नावे असणारी रुग्णवाहिका (Mahalunge) स्क्रॅप मध्ये खरेदी करून तिला विकू पाहणाऱ्या वर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार व्यवहारादरम्यान गाडीचे कागदपत्रे न देऊ शकल्याने समोर आला आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2022 ते आज पर्यंत निघोजे येथील इम्पेरियल ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये घडली आहे.
याप्रकरणी रवी राघवेंद्र भुतेकर (वय 50 रा देहूरोड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी झाकीर खान (रा छत्रपती संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे काम करत असलेल्या इम्पेरियल इंडस्ट्रीज या कंपनीला एका रुग्णवाहिकेची गरज होती. यासाठी फिर्यादी यांनी इंटरनेटवर एक रुग्णवाहिका विक्रीसाठी असल्याचे शोधले. आरोपी ने 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजता संबंधित रुग्णवाहिका मारुती ओमिनी (एम एच 01 एस ए 4173) ही गाडी दाखवण्यासाठी कंपनी इथे घेऊन आला. यावेळी ॲम्बुलन्स जुनी असल्याचे लक्षात येतात त्यानुसार दोन लाख वीस हजार रुपयांमध्ये रुग्णवाहिकेचा व्यवहार ठरला.
आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीकडून आरटीजीएस पद्धतीने दोन लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम ही गाडीच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर घेण्याचे ठरले. मात्र त्यानंतर त्याने फिर्यादीच्या कंपनीशी कोणताही संपर्क साधला नाही, त्याने व्यवहारा वेळी आरसी बुक किंवा इतर गाडीची कागदपत्रे दिलेली नव्हती कंपनीने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो वेळोवेळी टाळाटाळ करत होता. याची खात्री करण्यासाठी कंपनीने माहिती काढली असता संबंधित रुग्णवाहिका आहे मुंबई रेल्वे पोलिसांचे उपयुक्त कार्यालय माझगाव यांच्या नावावर असल्याचे समजले.
ही गाडी आरोपीने स्क्रॅप मध्ये खरेदी केली होती. याची कोणतीही पूर्वकल्पना न देता आरोपी ही गाडी फिर्यादी यांच्या कंपनीला परस्पर विकू पाहात होता. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच कंपनीच्या प्रशासनाने महाळुंगे एमआयडीसी -पोलीस ठाण्यात आरोप विरोधात तक्रार दिली असून पोलीस याचा अधिक तपास करत (Mahalunge) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.